Monday, 15 October 2018

Sukhachya Sarini He Man Bavare / सुखाच्या सरींनी… हे मन बावरे - Zee Marathi

मन माझे उडते
अल्लड वाऱ्यावरी
मन माझे भुलते
हि काय जादूगिरी
प्रेमाच्या चांदण्यांना
अंगावर कोंदताना
वाटते आपलेसे
परके का कोणी
हुरहूर दाते का मनी

हळव्या क्षणांनी… हे मन बावरे
सुखाच्या सरींनी… हे मन बावरे

Tula Pahte Re / तुला पाहते रे - Zee Marathi - TV Serial Title Track

हाक देता तुला साद जाते मला
वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा
कोण जाणे जीवनाचा
खेळ आहे हा कसा
चेहराही तूच माझा
तूच माझा आरसा
तुला पाहते रे…

TV Serial: Tula Pahate Re (2018)
Music: Ashok Patki
Lyrics: Vaibhav Joshi
Singer: Arya Ambekar
Music on: Zee Marathi
 

Thursday, 29 March 2018

हळदी ला - Halad Song Lyrics – Choti Malkin – Star Pravah

रेवती नवरी नटली या
आज हळदीच्या दिवसाला
आज हळदीच्या दिवसाला

ये.. गाव लोक जमल या
रेवती ताईच्या हळदी ला
गाव लोक जमल या
रेवती ताईच्या हळदी ला

ग्रहण – Grahan Lyrics – Zee Marathi

क्षणमात्र घडली माया क्षणात विश्व बुडाले
ओंजळीत हि सुन्न रात्र अन एक गूढ कोडे
श्वासात गुंतली नाती पावले शोधती छाया
माझी मलाच का रे भासे अनोळखी काया
धुक्यात विरून गेला आठवांचा गाव मागे
जेथे पाहते तेथे आता ग्रहण लागे…
TV Serial: Grahan
Channel: Zee Marathi
Music: Ashok Patki
Lyrics: 
Singers: Devaki Pandit

छोटी मालकीण – Chhoti Malkin - Star Pravah

रान सारं धुंद झालं चाहूल तुझी
छान छनन वाजत आली पाऊल तुझी
वाऱ्यावरी पसरले सूर मखमली
मनामंदी झुलली माझ्या तुझी सावली
रानोरानी पानोपानी प्रीत जागली
नजरेला जेव्हा तुझ्या नजर भेटली
TV Serial: Chhoti Malkin
Channel: Star Pravah
Music: Devendra Bhome
Lyrics: Vaibhav Deshmukh
Singers: Adarsh Shinde